काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी ट्विट करत आपला मुद्दा मांडला आहे. कोव्हॅक्सिन या लशीने अद्यार तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केलेली नाही. या लशीला वेळेपूर्वीच मंजुरी देण्यात आलेली आहे. हे धोकादायक ठरू शकते. @drharshvardhan यांनी ही स्थिती स्पष्ट करावी. या लशीची चाचणी पूर्ण होत नाही, तो पर्यंत तिचा वापर टाळायला हवा. या दरम्यान भारत लसीकरण अभियानाची सुरुवाच अॅस्ट्राजेनेकाच्या लशीसोबत सुरू करू शकतो, असे थरूर यांनी म्हटले आहे.
दुसरे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी देखील भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लशीला मंजुरी देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ‘भारत बायोटेक ही प्रथम दर्जाची कंपनी आहे. मात्र, या कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लशीसाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृत प्रोटोकॉल दुरुस्त केला जात आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे. आरोग्य मंत्री @drharshvardhan यांनी हे स्पष्ट केले पाहिजे.’
क्लिक करा आणि वाचा-
मात्र, काँग्रेसकडून अधिकृतपणे पक्षाची अधिकृत प्रतिक्रियेत प्रसारमाध्यम प्रमुखाने लशीच्या मंजुरीवर कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही. दोन दिवसांपूर्वी सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्डने विकसित केलेली लस कोव्हिशील्डला अंतिम मंजुरी देण्याची शिफारस डीसीजीआयकडे केली होती. यानंतर काल भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेली कोव्हॅक्सिन या लशीची देखील शिफारस केली होती. भारत औषध महानियंत्रकाने या दोन्ही लशींना आज अंतिम मंजुरी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times