नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विरोधी पक्ष म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून तुकडे-तुकडे गँग आहे, असा घणाघाती हल्ला शहा यांनी केला आहे. दोन वर्षापूर्वी जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. भारत तेरे टुकडे टुकडे हजार असं म्हटलं गेलं. अशा लोकांना तुरुंगात टाकायला हवं की नाही? या लोकांना तुरुंगात टाकलं तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून आवई उठवतात, अशी टीकाही त्यांनी केली.

नवी दिल्लीतील बादली विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना अमित शहा यांनी ही टीका केली. देशविरोधी शक्तींना नियंत्रणात आणण्याचं काम जर कोणी करू शकत असतील तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात. मोदींनी ५ ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० कलम रद्द केलं. उद्या २६ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा डौलाने फडकेल. हे तुम्ही टीव्हीवर पाहा, असं आवाहन शहा यांनी केलं.

मोदींनी देश बदलला. आता दिल्ली बदलायची आहे. दिल्लीची जनता हा बदल घडवून आणू शकते. ८ फेब्रुवारीला तुम्ही हा बदल घडवून आणाच, असं आवाहनही त्यांनी केली. यावेळी त्यांनी केजरीवाल सरकारवरही जोरदार निशाणा साधला. केजरीवाल म्हणतात दिल्लीतील प्रत्येक घरात स्वच्छ पाणी देणार. मुळात मोदींनीच देशातील प्रत्येक घरात स्वच्छ पाणी देण्याची आधीच घोषणा केली आहे. त्यात दिल्लीही आलीच. त्यामुळे केजरीवाल यांची ही घोषणाच दिशाभूल करणारी आहे, अशी टीकाही त्यांनी दिली. केजरीवाल यांनी अनेक घोषणा केल्या. त्यांच्या सर्व घोषणा फसव्या निघाल्याचा दावाही त्यांनी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here