मुंबईः औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत दोन गट पडले असतानाच समाजवादी पक्षाचे नेते यांनीही नामांतराला विरोध केला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानं ही भूमिका घेतल्यानंतर शिवसेना नेते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी हे समजूतदार नेते आहेत. त्यांचा संभाजीनगरला काही विरोध असेल असं वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं ही जनतेच्या मनातली इच्छा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ३० वर्षांपूर्वीच औरंगाबादच नामांतरण केलं आहे त्यावर आता फक्त सही शिक्का उमटायचा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद विमानतळाचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे पाठवला आहे. त्यावर केंद्र अजूनही निर्णय घेत नाही. भाजप नेते यावर का बोलत नाही, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

औरंगाबादबाबत शिवसेनेची भूमिका सर्वांना माहिती आहे. जे नामांतराला विरोध करत आहेत, त्या पक्षांना का भाजप का प्रश्न विचारत नाही? ते शिवसेनेला प्रश्न का करतात?, अशी टीका राऊतांनी भाजपवर केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here