मुंबई: येथील विधान भवनात विधिमंडळ सचिवालयाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांचं भाषण सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळं इतर सदस्यांना आवाज ऐकू येत नव्हता. हे लक्षात येताच नागपूरवाले मला ‘म्यूट’ का करताहेत,’ असा मिश्किल सवाल त्यांनी केला. त्यांच्या या टिप्पणीवर उपस्थितांमध्ये हंशा पिकला. (CM inaugurates State Legislature Secretariat)

वाचा:

‘सध्याच्या केंद्रीकरणाच्या काळात महाराष्ट्रात विधिमंडळ सचिवालयाच्या कक्षाच्या माध्यमातून विकेंद्रीकरण केले जात आहे. विधिमंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन हा त्याचाच एक भाग आहे,’ असं म्हणत, मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच टोला हाणला. ‘हे कार्यालय सुरू होणं ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. या कार्यालयाच्या निमित्तानं आणि नागपूर जवळं आलं आहे. मागील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी नागपूरमध्ये होतो. त्या काळात विधान भवनाच्या वास्तूमध्ये विधिमंडळाचं कार्यालय सुरू असायचं. मात्र, केवळ अधिवेशनापुरतं हे कार्यालय सुरू राहणं हे योग्य नव्हतं. आता बाराही महिने हे कार्यालय सुरू राहील,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

वाचा:

‘नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे ही अभिमानाची बाब आहे. हे महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. विदर्भ माझ्या हृदयात आहे. त्यामुळं विदर्भावर अन्याय होणार नाही, कुणी करत असेल तर आम्ही ढाल बनून उभे राहू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here