मुंबई: ‘भाजपच्या जातीयवादी, लोकशाहीविरुद्ध धोरणाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते. ईडी, मागे लावली जाते. पण मग एमआयएम, यांच्या मागे का लागत नाही?,’ असा खडा सवाल माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केला आहे. (Eknath Gaikwad on and Action)

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून काँग्रेस नेते शिवकुमार लाड यांच्या वडाळा येथील संपर्क कार्यालयाचं उद्घाटन एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते रविवारी झालं. त्यावेळी ते बोलत होते. भाजपकडून होणाऱ्या ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) राजकीय वापरावरही त्यांनी कडाडून टीका केली. ‘एमआयएम आणि वंचितच्या मागे ईडी, सीबीआय का लागत नाही, असा नेमका प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘या पक्षांमुळं भाजपाला फायदा होतो. हे पक्ष काँग्रेसची मतं खातात आणि भाजपला निवडून देतात. निवडून आल्यानंतर भाजप द्वेष आणि जातीयवाद पसरवितो, असा आरोपही त्यांनी केला.

वाचा:

गायकवाड यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. ‘संविधानामुळेच मी पंतप्रधान झालो असं मोदी सांगतात. भाषणात डॉ. आंबेडकरांचं नाव घेतात आणि काम मात्र संविधानाच्या विरुद्ध करतात. त्याविरुद्ध आज कोणताही पक्ष, कोणताही नेता लढताना दिसत नाही. फक्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी एकटे लढत आहेत. म्हणून राहुल गांधी यांच्या बाजूनं उभे राहा. सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष फक्त काँग्रेसच आहे हे जगाला दाखवून द्या,’ असं आवाहनही त्यांनी केलं.

वाचा:

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. बेस्ट समिती सदस्य राजेश ठक्कर, कार्यालयीन प्रभारी कुतुबुद्दीन सय्यद, जिल्हाध्यक्ष हुकुमराज मेहता यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेचे प्रश्न सोडविणार

‘वडाळा येथील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील,’ अशी माहिती यावेळी शिवकुमार लाड यांनी दिली. ‘या कार्यालयात पक्षाचे मंत्री आणि पदाधिकारी जनतेला प्रत्यक्ष भेटतील. त्यामुळं विभागातील समस्या तातडीनं मार्गी लागतील. अशाच प्रकारे मुंबईत प्रत्येक वार्डमध्ये संपर्क कार्यालय सुरू करून जनतेशी संपर्क साधला जाणार आहे. पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिला जात आहे, असंही शिवकुमार लाड यांनी सांगितलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here