पुणे: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील मगरपट्टा परिसरात चौकात हत्या केल्यानंतर चादरीत गुंडाळलेला मृतदेह रस्त्यावर फेकला होता. या हत्येचा छडा लावण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मगरपट्टा चौकात १ जानेवारीला सकाळी एक मृतदेह फेकून देण्यात आला होता. मृतदेह चादरीत गुंडाळलेला होता. एका वाहनातून तो मृतदेह आणण्यात आला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी हा प्रकार बघितला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. हडपसर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपास केल्यानंतर मृतदेह एका केटरर्समध्ये काम करणाऱ्या कामगाराचा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती.

पोलिसांनी केटरर्सचा मालक व्यास याच्यासह तुकाराम कदम, संतोष पुजारी आणि संपत काळे या तिघांनाही अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह ज्या वाहनातून फेकण्यात आला होता, त्यावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी हा प्रकार बघितला होता. पोलिसांनी तपास केला असता, त्या वाहनाचा क्रमांक हाती लागला. ते वाहन लोणी काळभोरच्या व्यास याच्या मालकीचे होते. त्यानंतर पोलिसांनी लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने व्यासला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, या हत्येचा उलगडा झाला. कामगाराचा गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांनी कामगाराची हत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here