नवी दिल्ली:
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजप नेते अरूण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर सन्मान जाहीर झाला आहे, तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मरणोत्तर सन्मान जाहीर झाला आहे. बॉक्सर मेरी कोम यांच्यासह एकूण ७ जणांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाले आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांच्यासह १६ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पद्मविभूषण सन्मानाचे मानकरी :

दिवंगत जॉर्ज फर्नांडिस, दिवंगत अरुण जेटली, दिवंगत सुषमा स्वराज, दिवंगत विश्वेशतीर्थ स्वामी श्री पेजावर अधोखजा मठ उडुपी, अनिरुद्ध जुगनौथ जीसीएसके, छन्नुलाल मिश्रा, मेरी कोम.

पद्मभूषण सन्मानाचे मानकरी :

एम. मुमताज अली, सय्यद मुआझ्झीम अली (मरणोत्तर), मुझफ्फर हुसेन बेग, अजोय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोषी, कृष्णम्मल जगन्नाथन, एस. सी. जमीर, अनिल प्रकाश जोशी, डॉ. सेरिंग लँडोल, आनंद महिंद्रा, नीलकांत मेनन (मरणोत्तर), मनोहर पर्रिकर (मरणोत्तर), जगदीश शेठ, पी. व्ही. सिंधू, वेणू श्रीनिवासन.

दरम्यान, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देशभरातील ११८ नामवंतांना
जाहीर करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. ‘बीजमाता’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या
, अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच
, अभिनेत्री कंगना रनौत, गायक सुरेश वाडकर, अदनान सामी आणि क्रिकेटपटू झहीर खानसह महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

19 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here