मुंबईः गेल्या २४ तासांत १० हजार ३६२ रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. तर, २९ जणांचा करोना संसर्गानं मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागानं जाहीर केलेली आजची आकडेवारीमुळं राज्याला मोठा दिलासा आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात करोनाच्या नव्या स्ट्रेनचे ८ रुग्ण सापडल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली असतानाच राज्यात गेल्या २४ तासांतील आकडेवारी पाहता करोना मृतांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं काही अंशी राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात आज मोठ्या संख्येनं करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आज राज्यात तब्बल १० हजार ३६२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यात आतापर्यंत १८ लाख ४७ हजार ३६१ रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट ९४. ८८ टक्के इतका झाला आहे.

राज्यात आज २ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. आता राज्यात १९ लाख ४७ हजार ०११ करोना रुग्णांची संख्या झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात करोनामुळं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ६९५ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५% एवढा आहे. राज्यात एकूण ४८ हजार ८०१ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३०,०४,८७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,४७,०११ (१४.९७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४१,७२८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,०७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here