वाचा:
संबंधित तरुणाने हे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी दोघांमध्ये पूर्वी प्रेमसंबंध होते, अशी माहिती पुढे येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, इन्फिनिटी मॉलच्या मागील बाजूस गोरेगाव लिंक रोडच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली. दोघांमध्ये वाद झाला व त्यातूनच सदर तरुणाने तरुणीवर गोळी झाडली व नंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली, असे सांगण्यात येत आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास भररस्त्यात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी देशी बनावटीची रिवॉल्व्हर जप्त केली आहे.
वाचा:
मृत पावलेला तरुण २७ वर्षीय तर तरुणी २२ वर्षीय असून त्यांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. हा तरुण भागात राहाणारा होता व त्याच्यावर खंडणी व दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत, या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या घटनेचा तपास करत आहेत. संबंधित तरुणी व मृत आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. ही तरुणी मालाडमध्ये राहणारी होती व काही दिवसांपूर्वीच तिने अन्य तरुणाशी विवाह केला होता. या रागातूनच सदर तरुणाने हे कृत्य केले असावे असेही सांगण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच सह पोलीस आयुक्त ( कायदा आणि सुव्यवस्था ) यांनी घटनास्थळाला भेट दिली व त्यांनी घटनेची माहिती घेतली तसेच आवश्यक त्या सूचना संबंधित तपास अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times