मुंबई: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळे येथील तरुणाचे प्राण मुंबई सायबर पोलिसांनी वाचविले आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास फेसबुकने दिलेल्या त्रोटक महितीच्याआधारे सायबर पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत या तरुणाचे नाव, पत्ता मिळवत धुळे पोलिसांना सतर्क केले व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणाला वैद्यकीय उपचार मिळवून दिले. ( News )

वाचा:

धुळे येथील आपल्या निवासस्थानी ज्ञानेश पाटील (२३) या तरुणाने रविवारी रात्री गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रसंग त्याने फेसबुक लाइव्ह करीत सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ फेसबुकच्या आयर्लंड येथील मुख्यालयाने पाहून सायबरच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांना त्याबाबत कळवले. ज्ञानेशचे फेसबुक खात्याला जोडलेले तीन मोबाइल क्रमांकही त्यांनी दिले. सायबर पोलिसांनी या तरुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिन्ही मोबाइल बंद होते. करंदीकर यांनी दोन पथके तयार करत या तरुणाचा पत्ता शोधण्यासाठी धडपड सुरू केली. पथकातील सहायक निरीक्षक रवी नाळे यांनी अवघ्या १० मिनिटांत आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणांचे नाव आणि नेमका पत्ता शोधला.

वाचा:

सायबर पोलिसांनी हे तपशील महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अधीक्षक पंडित यांना दिले व पुढल्या पाच मिनिटांत धुळे पोलिसांनी ज्ञानेशचे घर गाठले. धुळे सायबर पोलिसांना गळा कापलेल्या अवस्थेतील ज्ञानेश सापडला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मुंबई सायबर पोलिसांनी नेमकी आणि वेळीच माहिती दिल्यामुळे त्याचे प्राण वाचले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here