वाचा:
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी रोजी सकाळी १०.४३ ला लोकलमधील महिला डब्यातून संबंधित पीडित महिला प्रवास करत होती. सकाळी ११ नंतर सामान्य महिला प्रवाशांना लोकल मधून प्रवास करण्याची मुभा असून त्यानुसार या महिलेने येथून लोकल पकडली. डब्यात ही महिला एकटीच होती. वडाळा स्थानकातून लोकल रवाना होताच आरोपीने महिला डब्यात प्रवेश केला. डब्यात एकट्या असलेल्या महिलेचा गैरफायदा घेत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून त्याने तिचा विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केला असता तिला धावत्या लोकलमधून ढकलून देत तो पसार झाला.
वाचा:
दरम्यान, आज, ४ जानेवारी रोजी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रेल्वे स्टेशनवर तसेच शहरात सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हाच आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले आहे, असे वडाळा रेल्वे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपीचा कसून तपास सुरू आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times