वाचा:
भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. वेगवेगळ्या प्रकरणाशी संबंधित ईडी या नेत्यांची चौकशी करत आहे. या साऱ्यामागे भाजप असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. रोहित पवार यांनीही आज भाजपला लक्ष्य केलं. ‘ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. उद्या कदाचित मलाही नोटीस येईल,’ असं ते म्हणाले.
वाचा:
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटला रोहित पवार यांनी आज सकाळी पाच वाजता भेट दिली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीदरम्यान रोहित यांनी मार्केटमधील व्यापारी व माथाडी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. ‘शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज आहे. केंद्र सरकारनं राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. शेतकरी कायदे व शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकूमशाहीची आहे. पण राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल,’ अशी ग्वाही रोहित पवार यांनी यावेळी दिली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times