वाचा:
बिनविरोध निवडणुका घेणारी गावे म्हणून आदर्शगाव हिवरे बाजार व राळेगणसिद्धी या दोन्ही गावांची ख्याती होती. राळेगणसिद्धीत ३५ वर्षांची ही परंपरा गेल्यावेळीपासूनच मोडली गेली. यावर्षीही तेथे निवडणूक होत आहे. गावातील तरुण पिढीला निवडणूक हवी असून त्याशिवाय आम्हाला लोकशाही प्रक्रिया कशी समजणार, अशी विनंती त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक यांना केली होती. त्यावर हजारे यांनी निवडणूक होऊ द्या पण शांततेत पार पाडा, अशा शब्दांत संमती दिल्याचे सांगण्यात येते.
वाचा:
मुख्य म्हणजे यावर्षी पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार यांनी बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावाला आमदार निधीतून २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी पहिला प्रतिसाद राळेगणसिद्धीतून आल्याचे सांगण्यात आले होते. स्वत: हजारे यांनी या योजनेचे कौतुक करून याचा आपण स्वत: प्रचार करणार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र, त्यांच्याच गावात निवडणूक घेण्याची वेळ आली. तेथे ९ पैकी २ जागा बिनविरोध होऊ शकल्या. अन्य सात जागांसाठी मतदान होणार आहे.
वाचा:
हिवरे बाजारमध्ये तर सर्वच्या सर्व म्हणजे सातही जागांवर निवडणूक होणार आहे. स्वत: पोपटराव पवार यांच्या वॉर्डातही त्यांच्याविरुद्ध एका खासगी संस्थेत शिक्षक म्हणून काम करणारे किशोर संबळे निवडणूक लढविणार आहेत. अन्य सर्वच जागांवर एकास एक लढत होणार असून गावातील पारंपरिक विरोधकांनी पवार यांच्याविरोधात दंड थोपटल्याचे दिसून येते. निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र यावेळी त्यांना यश आले नाही.
दरम्यान, पोपटराव पवार यांच्या विरोधातील पॅनलच्या उमेदवारांनी पोलीस संरक्षण मागितले आहे. गावातील राजकीय विरोधकांकडून जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
वाचा:
शिस्त विरुद्ध बेशिस्त अशी लढत!
शेवटी ही लोकशाही आहे. मधल्या काळात गावासाठी काम करताना काहींची नाराजी झाली असू शकते. त्यामुळे यावेळी निवडणूक बिनविरोध झाली नाही. त्यामुळे शिस्त विरुद्ध बेशिस्त अशी ही लढत असेल. विकास कामे हवीत की बेशिस्तीची मुभा, याचा निर्णय आता मतदारांनी घ्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया या सर्वावर पोपटराव पवार यांनी दिली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times