२९ डिसेंबर रोजी राजेश काळे यांच्याविरोधात सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून काळे फरार होते. त्यांच्या अटकेसाठी पथके नेमली होती. गेल्या आठ दिवसांत काळे यांनी सातारा, पुणे आणि परभणी या जिल्ह्यांत प्रवास केला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. आज, मंगळवारी अखेर त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले. पुणे ते टेंभुर्णीपर्यंत थरारक पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली.
सोलापूर महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात राजेश काळे यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करून शिवीगाळ केली होती. पांडे यांनी याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर काळे फरार होते. या काळात त्यांनी पुणे, सातारा आणि परभणीमध्ये वास्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. पथके त्यांचा शोध घेत होते. त्याचवेळी खबऱ्यांमार्फत आणि तांत्रिक मदतीने त्यांचा ठावठिकाणा लागला. पुणे ते असा पाठलाग करून सिटी क्राइम ब्रँचने त्यांना अटक केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times