अनिलकुमार हे मध्य प्रदेश भाजपमध्ये सक्रिय होते. मध्य प्रदेश भाजपच्या मीडिया सेलचे ते प्रमुख होते. महात्मा गांधी हे ‘पाकिस्तानचे राष्ट्रपिता’ असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या वक्तव्याप्रकरणी त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. गेल्याच महिन्यात त्यांची दिल्लीतील आयआयएमसीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. भारतीय भाषातील पत्रकारिता शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. नुकतंच त्यांना अमरावती येथील आयआयएमसीमध्ये बदली करण्यात आली आहे. अमरावती काँग्रेसनं या नियुक्तीचा निषेध केला आहे. त्याविरोधात आज निदर्शनंही करण्यात आली.
वाचा:
आश्चर्याची बाब म्हणजे, अनिलकुमार यांची ज्या अमरावती केंद्रात बदली करण्यात आली आहे, तिथं पत्रकारितेचे मराठी व इंग्रजी या दोनच भाषांतील अभ्यासक्रम आहेत. त्यांना यापैकी कुठल्याही भाषेतील अध्यापनाचा अनुभव नाही.
वाचा:
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती व जम्मू केंद्रात पुढील वर्षापासून हिंदी पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून अनिलकुमार यांची अमरावती तर, राकेश गोस्वामी यांना जम्मू केंद्रात नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अमरावतीहून दिल्लीतील विद्यार्थ्यांचे हिंदी पत्रकारितेचे वर्ग घेणार असल्याचे सांगितले जाते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times