मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने मुंबईच्या क्राउन बिझनेस हॉटेलवर छापा मारला. तेथून ४०० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. अभिनेत्री श्वेता कुमारी ही हैदराबाद येथील रहिवासी आहे. ती सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले की, अटक अभिनेत्रीविरोधात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अनेक ड्रग तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी या संपूर्ण प्रकरणात आर्थिक बाजूही तपासायला हवी, असे एनसीबीचे म्हणणे आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडच्या ड्रग संबंधांप्रकरणी एनसीबीकडून कारवाई करण्यात येत आहे. अनेक जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times