नाईट कर्फ्यूचा आजचा शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांना अत्यंत बारकाईने आकडेवारी आणि इतर सर्व गोष्टींची माहिती दिली जाते. लोकल ट्रेन आणि नाईट कर्फ्यू असो आपण दररोज करोना रुग्णांच्या आकडेवारीवर लक्ष ठेऊन आहोत. त्यामुळं नाईट कर्फ्यू अजून वाढवायचा का याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
वाचा:
राज्यात करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे. असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसंच, नागरिकांनी सतर्क राहावं, पण घाबरुन जाऊ नका पण काळजी घ्या, असं आवाहन केलं आहे. करोनाचा हा स्ट्रेन जास्त संसर्गजन्य आहे. ७० टक्के अधिक झपाट्याने संसर्ग होऊ शकतो, असंही ते म्हणाले आहेत.
वाचाः
७ जानेवारीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अनेक मुद्दे मांडणार आहोत. तसंच, केंद्र सरकारला इतर राज्यांनाही ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांबद्दल नियमावली तयार करण्यास सांगणार आहोत. जेणेकरुन ते रुग्ण त्या राज्यांमधून महाराष्ट्रात येऊ नयेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात लवकरच पत्र लिहणार आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times