प्रजासत्ताक दिनानिमित्त आज रविवारी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते राणी बागेतील पशू-पक्षी यांच्या दालनांचे लोकार्पण, उड्डाणपुलांचे भूमिपूजन तसेच मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण होणार आहे. या कार्यक्रमाबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत नावे न टाकल्याने , राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या गटनेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेच्या ‘जी/दक्षिण’ विभागात लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील डिलाइल पुलाच्या पोहोच रस्त्यांचे भूमिपूजन, संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) ते केशवराव खाड्ये मार्ग व संत गाडगे महाराज चौक ते डॉ. ई. मोझेस मार्ग येथील रेल्वेवरील दोन उड्डाणपुलांचे भूमिपूजन, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील प्राण्यांचे नवीन प्रदर्शनी कक्ष यांचे लोकार्पण यासह मुंबईत ६४ ठिकाणी मियावाकी पद्धतीने लागवड करावयाच्या वनीकरण मोहिमेचा शुभारंभ वडाळा येथेत भक्ती पार्क येथे हे कार्यक्रम होणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times