राज्यातील जनतेसाठी मोफत लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. राम कदम यांनी तसं पत्रदेखील मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. भारतात करोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून राज्यातील जनतेला ही लस मोफत दिली जावी, अशी अपेक्षा आहे. राज्यातील जनतेला वेळेत ही लस मोफत मिळेल अशी आशा आहे. या अगोदर राज्य सरकार सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलं आहे, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
वाचाः
जगभरात पसरलेल्या करोना संकटाचा परिणाम भारतावरही झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि विशेषतः महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत करोनामुळं होणाऱ्या मृत्यूंची संख्याही राज्यात अधिक आहे. राज्यातील नागरिकांना आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागत आहे, असं त्यांनी पत्रात लिहलं आहे.
वाचाः
केंद्र सरकारने आर्थिक मदत पुरवली असूनही राज्यातील गरजूंना मदत देण्यात आलेली नाही. शेतकरी, कामगार वर्ग, छोटे दुकानदार, रिक्षा-टॅक्सी चालक यांना या काळात मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. राज्यातील खराब आरोग्ययंत्रणेमुळं अनेक गरिबांना आपले प्राण गमवावे लागले. निसर्ग चक्रीवादळामुळं कोकणातील नागरिकांच्या समस्येतही अधिक वाढ झाली आहे. त्यांना अद्याप कोणतीही मदत देण्यात आलेली नाही, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times