मुंबईः महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर भाजपचं पुढील लक्ष्य आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महापालिका जिंकणं आवश्यक आहे. शिवसेनेनंही भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईतील अमराठी जनतेला आकर्षित करण्यासाठी शिवसेनेनं नवीन मोहिम उघडली आहे. तर, भाजपनं शिवसेनेच्या या मोहिमेवरुन टीका केली आहे. भाजपचे खासदार यांनी शिवसेनेच्या परप्रातीयांच्या भूमिकेबाबत भाष्य केलं आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं १० जानेवारी रोजी गुजराती बांधवाचा मेळावा आयोजित केला आहे. मुंबई मा जलेबी ने फाफडा, आपडा, अशी या मेळाव्याची टॅगलाइन आहे. रावसाहेब दानवे यांनी हाच धागा पकडत शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेची भूमिका परप्रांतीयांची भूमिका परप्रातीयांच्याबद्दल अनेकवेळा समोर आली आहे. आता सत्तेत आल्यावर त्यांची भूमिका आपण पाहतोय. भविष्यात ते मुस्लिम सामाजाचादेखील मेळावा घेऊ शकतात. कारण त्यांची भूमिका बदलली. हा संगतीचा परिणाम आहे. अन्य पक्षाच्या सोबत राहून त्यांची भूमिका बदलली असेल, असा टोला दानवेंनी लगावला आहे. टीव्ही ९ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times