पुणे: पुण्यात एका डिलिव्हरी बॉयला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्राहकाने परत केलेले पार्सल घेऊन रिक्षातून परतत असताना, रिक्षाचालक आणि प्रवाशांनी धमकावून त्याला लुटले. सर्व्हिस रोडवरील भूमकर चौकात काल, सोमवारी भरदुपारी ही घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनीष कुमार असे तक्रारदार डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार केली. तो मूळचा बिहारचा असून, सध्या हडपसर परिसरात राहतो. मनीष कुमारने पोलिसांत तक्रार केल्यानंतर हडपसर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. अवघ्या पाच तासांमध्ये पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या.

मनीष कुमार डिलिव्हरी बॉयचे काम करत असून, हिंजवडी परिसरात दिलेला पार्सल घेऊन परतत होता. हिंजवडीतील चौकातून त्याने रिक्षा पकडली. रिक्षामध्ये आणखी दोन सहप्रवासी होते. रिक्षाचालकाने त्याला त्याला निर्जन ठिकाणी नेले. रिक्षाचालक आणि सहप्रवाशांनी त्याच्याकडील मोबाइल, चांदीची चेन, दीड हजारांची रोकड, मोबाइलच्या अन्य अॅक्सेसरीज असा ऐवज लूटला. त्यानंतर त्याला मारहाण केली. याशिवाय पुलावरून खाली फेकून देण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर घाबरलेल्या मनीष कुमारने हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा अवघ्या पाच तासांत माग काढला. परमेश्वर नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here