या प्रकरणात फरार असलेला बोठे सापडत नसल्याने तपास अधिकाऱ्यांनी पारनेरच्या न्यायालयात स्टँडिंग वॉरंट मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. त्यामध्ये बोठे याच्यावतीने अॅड. संकेत ठाणगे यांनी अर्ज दाखल करत त्यावर युक्तिवाद केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराडे यांच्यासमोर यावर सुनावणी झाली.
अॅड. ठाणगे यांनी युक्तिवाद केला की, बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात फेटाळण्यास आल्यानंतर त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ३१ डिसेंबर रोजीच आपील केले आहे. त्यावरील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. त्यापूर्वीच पोलिसांनी पारनेरला स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज करणे योग्य नाही.
या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्याचा आरोपीला अधिकार आहे. तशी कायद्यात तरतूद आहे. त्यावर निर्णय होण्याआधीच स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज दाखल केला आहे. यातून बोठेला पोलिसांकडून टार्गेट केले जात आहे. बोठेला जामीन मिळवून द्यायचा नाही, असेच यातून दिसते आहे. बोठे अटक टाळत नसून, अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तो त्याला अधिकार आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले असून यावर न्यायालय उद्या बुधवारी निर्णय देणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times