विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समजात पायलट विमानातून सुखरूप बाहेर येण्यास यशस्वी ठरला. हवाई दलाच्या या लढाऊ विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. विमान दुर्घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रशासनाला माहिती दिली. हवाई दलाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रात्री ८.१५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली, अशी माहिती हवाई दलाने ट्विट करून दिलीय.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मिग- २९ के हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान अरबी समुद्रात कोसळले होते. या घटनेत विमानतील पायलट कमांडर निशांत सिंह हे बेपत्ता झाले होते. तर विमानात बसलेल्या दुसऱ्या पायलटला वाचवण्यात यश आलं होतं.
पायलट निशांत सिंह यांचा शोध घेत असताना समुद्रात लँडिंग गीअर, टर्बोचार्जर, फ्यूल टॅंक इंजिन आणि विंग इंजिन आढळून आले. ९ युद्धनौका आणि १४ विमानांव्यतिरिक्त, भारतीय नौदलाचा वेगवान इंटरसेप्टरचा उपयोग निशांत सिंह यांना शोधण्यासाठी केला गेला. अखेर काही दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times