मुंबई: अभिनेत्री आणि तिची बहीण या दोघींनी विशिष्ट समुदाय आणि धर्माविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये करून त्या समुदायाचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला, अशा आरोपांविषयीच्या चौकशीसाठी अंधेरीतील अंबोली पोलिसांनी मंगळवारी अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून आणखी मुदत मागितली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना अखेरची संधी ५ फेब्रुवारीला चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. ( )

वाचा:

अॅड. यांनी याप्रकरणी येथे खासगी तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेतल्यानंतर दोन्ही आरोपींविरोधातील पुरावे हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील असल्याने पोलिसांनी चौकशी करून ५ डिसेंबरपर्यंत अहवाल द्यावा, असा अंतरिम आदेश न्यायालयाने २९ ऑक्टोबरला दिला होता. मात्र, ५ डिसेंबर रोजीच्या सुनावणीत पोलिसांनी एक महिन्याची वाढीव मुदत देण्याची विनंती केल्याने न्यायालयाने ती मान्य केली होती. परंतु, त्यानुसार, मंगळवारी हा विषय पुन्हा सुनावणीस आला असता पोलिसांनी पुन्हा आणखी एक महिन्याची मुदत देण्याची विनंती केली. तेव्हा, अॅड. अली यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला.

वाचा:

‘मी पोलिसांना आरोपींच्या संपर्काचे तपशील दिले आहेत. पोलिसांनी माझा जबाबही एक महिन्यापूर्वीच नोंदवला आहे. तरीही ते पुढील तारखा मागून या न्यायालयाचा वेळ विनाकारण वाया घालवत आहेत. त्यामुळे पोलिसांना आणखी संधी देऊ नये किंवा दिली तर ती शेवटची द्यावी’, अशी विनंती अली यांनी न्यायाधीश यांना केली. अखेर दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी अंबोली पोलिसांना अखेरची संधी देत आणखी एक महिन्याची मुदत देऊन ५ फेब्रुवारीला फौजदारी दंड संहितेच्या कलम २०२ अन्वये चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here