‘पीएमपी’च्या कर्मचाऱ्याने ई-बससमोर केलेला ‘टिकटॉक व्हिडिओ’ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारे गणवेशात बसमध्ये किंवा बससमोर ‘ऑनड्युटी’ असताना व्हिडिओ करणाऱ्यांवर तीव्र कारवाई करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.
गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण झाले. तेव्हा ई-बस सजविण्यात आल्या होत्या. त्या वेळी कंत्राटी चालकाने व्हिडिओ केला होता. तसेच, तो ‘टिकटॉक’वर प्रसारितही केला होता. गेल्या दोन-चार दिवसांत हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हयरल होत आहे. प्रशासकीय शिस्तीच्या दृष्टीकोनातून ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे पीएमपीची प्रतीमा मलिन होत आहे. याबाबत आगार व्यवस्थापकांनी आगारातील सर्व चालक, वाहकांना आणि खासगी बसवरील चालकांना व्हिडिओ किंवा फोटो तयार करून व्हायरल न करण्याबाबत सूचित करावे, असा आदेश पीएमपी प्रशासनाने दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times