नवी दिल्लीः करोना लसीवरील ( ) वाद योग्य नाही. संशय घेऊ नका. देशातील जनतेने नियामक संस्थांवर विश्वास ठेवावा, असं लसीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया ( ) म्हणाले. डाटाचा व्यापक अभ्यास केल्यानंतरच या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. म्हणून देशातील जनतेने नियामक संस्था, शास्त्रज्ञ आणि संशोधकांवर विश्वास ठेवला पाहिजे, असं आवाहन डॉ. गुलेरिया यांनी केलं.

कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहेत. तज्ज्ञ समितीने अभ्यास केल्यानंतरच त्यांना मंजुरी देण्यात आली. आमच्या नियामक संस्थांनी जर हिरवा झेंडा दिला असेल तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढे जायला हवं, असं डॉ. गुलेरिया म्हणाले.

लसीचा डोस घेतल्यावर हलका ताप, अॅलर्जी होईल. पण ही एक सामान्य बाब आहे. आपण लसीकरण मोहीम जितक्या लवकर सुरू करू तितक्या लवकर या आजारापासून मुक्त होऊ शकू, असं डॉ. गुलेरिया लसीच्या साइड इफेक्टवर म्हणाले. युरोपमध्ये परिस्थिती चांगली नाही. पुन्हा एकदा लॉकडाऊन आहे. जर आपण वादात अडकून लस देण्यास उशीर केला आणि त्या दरम्यान ब्रिटनमधील करोनाच्या नवीन व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्याकडे झाला तर करोनाविरूद्धच्या लढाई आतापर्यंत मिळवलेल्या यशावर पाणी फेरलं जाईल, असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं.

या आजारावर आपल्याकडे सध्या कोणतंही औषध नाही, लस हा एकमेव पर्याय आहे. आपण सक्रिय राहणं गरजेचं आहे. संसर्ग झाल्यावर लसीबद्दल विचार करणं योग्य नाही. त्याआधी आपण पुढे जाऊन लस घ्यायला हवी, असं त्यांनी स्पष्ट केलं.

लसीबद्दल एकेक करून अफवा पसरत आहेत. मात्र, या अफवांकडे लक्ष देऊ नका, असं आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं. या लसीमध्ये डुकराच्या मांसचा भाग नाही. दोन्ही लसींमध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही. या व्यतिरिक्त या लसीपासून नपुंसकत्व यासारख्या गोष्टीही मूर्खपणाच्या आहेत. करोनाबद्दल सोशल मीडियावरून जे मेसेज येतात त्याबद्दल सत्य जाणून घेतल्याशिवाय ते शेअर करू नका, असं गंगाखेडकर म्हणाले. ‘आज तक’ने हे वृत्त दिलं आहे.

फायझरची लस भारतासाठी योग्य का नाही?

फायझरची लस भारतासाठी योग्य नाही. कारण ती ७० डिग्री तापमानात साठवावी लागते. जे भारतात शक्य नाही. याशिवाय फायझरची लस महागही आहे, असं मेदांता रुग्णालयाचे चेअरमन म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here