वाचा:
अमिषा पटेल हिने ४ जानेवारी रोजी इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे तुमचे खाते पुढील २४ तासांत सस्पेंड होईल असा संदेश अमिषा हिच्या मोबाइलवर आला होता. या संदेशासोबत कॉपीराइट नो ऑबजेक्शन फार्म अशा नावाची लिंक पाठवली गेली होती. अमिषा हिने लिंकवर क्लिक करताच तिचे अकाऊंट हॅक झाले होते.
वाचा:
सायबर पोलिसांनी याबाबत इन्स्टाग्रामच्या कार्यालयात संपर्क साधून त्यांच्या मदतीने आमिषा हिचे अकाऊंट अवघ्या काही तासांतच पूर्ववत केले आहे. संदेशासोबत पाठविण्यात आलेली लिंक नेदरलॅंड मधून तर त्याचा आयपी ॲड्रेस हा तुर्कस्थानचा होता. त्यामुळे अशाप्रकारे फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
वाचा:
दरम्यान, अमिषा पटेलने इन्स्टाग्रामवरूनच पोलिसांचे तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आभार मानले आहेत. ‘रविवारी माझे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते मात्र विक्रमी वेळेत हे अकाउंट पूर्ववत करण्यात आले आहे. त्यासाठी मी संबंधित सर्वांचे आभार मानते. प्रत्येकानेच अशा सायबर हल्ल्यांपासून सावध राहायला हवे’, असे अमिषाने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये नमूद केले आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times