नवी मुंबई: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत सगळ्याच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते यांच्यापुढे यावेळी तगडे आव्हान असणार हे स्पष्टपणे दिसत आहे. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसने गणेश नाईक यांना धक्का दिला असून नाईक समर्थक नगरसेविका व त्यांचे पती माजी नगरसेवक यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. (BJP corporator Latest News )

वाचा:

महापालिकेवर गणेश नाईक यांचे सातत्याने वर्चस्व राहिले आहे. यावेळी नाईक कुटुंब भाजपसोबत असून सध्या सुरू असलेली राजकीय उलथापालथ लक्षात घेता गणेश नाईक हे महापालिकेत आपले वर्चस्व राखू शकणार का?, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. पालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असताना त्याआधी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी गणेश नाईक यांना लागोपाठ धक्के दिले आहेत.

वाचा:

गणेश नाईक यांचे खंदे समर्थक असलेल्या नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांनी काही दिवसांपूर्वीच नाईक यांची साथ सोडली आहे. दोन्ही नगरसेविकांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते हातावर शिवबंधून बांधून घेतले आहे तर नवीन गवते यांच्या शिवसेना प्रवेशाची केवळ औपचारिकता उरलेली आहे. एकीकडे नाईकसमर्थक तीन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले असताना आता आजी-माजी नगरसेवक दाम्पत्य राष्ट्रवादीत गेलं आहे. वाशीतील नगरसेविका दिव्या गायकवाड आणि त्यांचे पती माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांनी या दोघांचं राष्ट्रवादीत स्वागत केलं. यावेळी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

वाचा:

वैभव व दिव्या गायकवाड हे गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला तेव्हा गायकवाड दाम्पत्यानेही पक्षांतर केले होते. मात्र, सध्या नवी मुंबईत भाजपात अस्वस्थता वाढत चालली असून त्यातूनच या दोघांनी भाजपला रामराम ठोकल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here