अहमदनगर: करोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर युरोपातून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईत कडक तपासणी करण्यात येत आहे. त्यातून काही प्रवाशांनी पळवाट शोधली असून ते मुंबईत न येतात हैद्राबादमार्गे येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता हैद्राबादहून आलेल्या प्रवाशांवरही प्रशासानाने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

युरोपीय देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने नियमावली कडक केली आहे. तपासणी, विलगीकरण अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना त्या त्रासदायक वाटत असल्याने त्यांनी यातून पळवाट शोधली आहे. अशी तपासणी महाराष्ट्रातच होत आहे. त्यामुळे युरोपातून येताना मुंबईऐवजी हैद्राबादला यायचे आणि तेथून इच्छित ठिकाणी जायचे, अशी पळवाट काही प्रवासी अवलंबत आहेत. या मार्गाने काही जण नगरमध्येही येण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

वाचा:

‘युरोप अथवा इतर देशातून प्रवास करुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती असेल तर ती जिल्हा प्रशासनला द्यावी. ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर राज्य शासनाने त्या देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही प्रवासी हे मुंबईहून न येता हैदराबाद मार्गे येऊ शकतात. त्यामुळे २५ नोव्हेंबर, २०२० पासून परदेश प्रवास करुन अशा प्रकारे जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

वाचा:

करोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी कोणत्याही प्रकारे हा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. त्या अनुषंगाने चाचण्यांमध्ये पॉझिटीव आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिक शोधणे आणि त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. बाहेरील देशात प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांचा शोध घेणे आणि त्यांची चाचणी करणे आवश्यक असल्याने ही माहिती प्रशासनास देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here