वाचा-
सिडनीत उद्यापासून होणाऱ्या कसोटी रोहित शर्मा आणि नवदीप सैनी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीत जलद गोलंदाज उमेश यादव जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या जागी निवड समितीने नवदीप सैनीवर विश्वास दाखवला आहे. तो भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण करेल.
वाचा-
सलामीवीर मयांक अग्रवालच्या जागी स्टार फलंदाज रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत मयांक अग्रवालला धावा करता आल्या नव्हत्या. त्यामुळे त्याच्या जागी रोहितला संधी देण्यात आली आहे.
वाचा-
असा आहे भारतीय संघ- अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times