वाचा:
‘मुंबई मां जलेबी ने फाफडा; उद्धव ठाकरे आपडा’, अशी टॅगलाइन देत शिवसेनेनं गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यावरून भातखळकर यांनी खोचक ट्वीट केलं होतं. ‘शिवसेनेनं साद घातली असली तरी गुजराती मतदारानं मनाशी पक्कं ठरवलं आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, जनाबसेनेला आपटा’, असं भातखळकर यांनी म्हटलं होतं. हेमराज शाह यांनी भातखळकरांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे.
‘गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले. ९२-९३ च्या दंगलीमधे गुजराती बांधवाना शिवसेनेनं खरी मदत केली. संरक्षण दिलं. ‘मी मुंबईकर’ म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व भाषिकांना आपलंसं केलं. भाजपनं फक्त मतदानापुरतं गुजराती बांधवांना वापरलं आणि नंतर वाऱ्यावर सोडलं,’ असा आरोप शाह यांनी केला.
वाचा:
‘भातखळकरांच्या पक्षाची अवस्था सध्या घर का ना घाट का, अशी झाली आहे. बाबरी यांनी नाही पाडली, राममंदिराचा निर्णय यांनी नाही घेतला, पैसा जनतेचा वापरणार, मग श्रेय कसले?, असा सवाल देशाची जनता तुम्हाला विचारतेय. देशभरातील गुजराती आणि हिंदूंनी मिळून रामजन्मभूमी आंदोलन पेटवले होते हे तुम्ही कसे विसरलात? त्याची फळे आज भलतेच कोणी चाखत आहे. भाजपचे नेते अस्वस्थ आहेत. मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपमध्ये त्रस्त आहेत. गुजराती माणूस स्वाभिमानी आहे, भाजपनं त्याला स्वतःची जागीर समजू नये,’ असा इशाराही शाह यांनी दिला आहे.
वाचा:
‘ज्या गुजराती मतांवर डोळा ठेवून भाजप मुंबईत राजकारण करते, त्यांनाच नंतर खोटी आश्वासन देऊन फसवले जाते. भाजपला मुंबईत फक्त लोढा हवा, इतर गरीब गुजराती मारवाडी समाज नको. म्हणून भाजपवर संपूर्ण गुजराती समाज नाराज आहे. मुंबईमा उद्धव ठाकरेच आपडा वाटणार, कारण ते सुसंस्कृत आहेत. गुजराती माणसाला ते आवडतात. गुजराती समाज यावेळी भाजपला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही शाह यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times