मुंबई: मुंबईतील अंधेरी येथे एका मॉडेल-अभिनेत्रीच्या फ्लॅटमध्ये रोकड आणि दागिन्यांची झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका टिकटॉक स्टारला अटक केली आहे. या टिकटॉक स्टारचे ९ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अभिमन्यू गुप्ता (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. त्याने बतावणी करून खुशबूला फसवले. जोपर्यंत भाड्याने फ्लॅट घेत नाही, तोपर्यंत तुझ्यासोबत राहू शकतो का, असे त्याने तिला विचारले. त्यावर खुशबूनेही त्याला परवानगी दिली. अभिमन्यू तिच्यासोबत १२ दिवस राहिला.

इन्स्टाग्रामवर झाली होती मैत्री

अभिमन्यूने काही वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर खुशबूसोबत मैत्री केली. खुशबूने सांगितले की, ती काही कामानिमित्त १८ ते २२ डिसेंबर या दरम्यान विदेशात गेली होती. माझ्या घरी अभिमन्यू होता. १ जानेवारीला घरी परतल्यानंतर बघितले की, घरातून रोकड आणि दागिने चोरीला गेले आहेत. अभिमन्यूने सांगितले की पोलिसांत तक्रार करू नको. पोलीस माझ्या मित्रांना त्रास देतील अशी बतावणी त्याने केली. मात्र, मी पोलिसांत तक्रार दाखल केली.

ओशिवरा पोलिसांनी इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी संशयित व्यक्ती बुरखा घालून आली होती. तिच्या पायात जेन्ट्सचे बूट होते. पोलिसांनी त्याच्या चालण्याची पद्धत बारकाइने बघितली असता, ती अभिमन्यूसोबत मिळतीजुळती होती. पोलिसांनी त्याची दुचाकी तपासली. सीटखाली चोरलेला ऐवज जप्त केला. त्यांनी अभिमन्यूला अटक केली. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. २०११ पासून त्याला अनेकदा अटक केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here