पुणेः ‘विरोधकांना परत येईन असं वाटत असतानाच एक धक्का बसला आणि आता परत जायची वेळ आली आहे,’ अशा शब्दांत विधानपरिषदेच्या उपसभापती यांनी विरोधीपक्ष नेते यांच्यावर टीका केली आहे.

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेवर उत्तर देताना निलम गोऱ्हे यांनीही भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

‘विरोधी पक्षाचं काम सरकारवर टीका करण्याचं आहे. जर त्यांनी टीका केली नाही तर ते आमच्या नाटक कंपनीतील एक पात्र आहेत अशी शंका वाटेल. प्रेक्षक म्हणून ते चांगली भूमिका निभावत आहेत. लोकशाहीसाठी जागृत विरोधीपक्षाचं काम निभवावं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे. आमच्या हेतूवर कितीही शंका केली तरी आघाडी सरकारने काम केलं आहे,’ असंही त्यांनी नमूद केलं आहे.

‘राजकीय भूमिका घेणं हे विरोधी नितीचं कामच आहेच. एकतर त्यांना धक्का बसला मी परत येईन ऐवजी आता परत जायची वेळ आली आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. तसंच, ‘मी चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातून निवडुन येण्याच्या आधी परत एकदा कोथरुड मध्ये निवडुन येऊन दाखवा, असं म्हणाले होते. त्यामुळं परत जाण्याच्या आणि येण्याच्या आधी त्याबद्दलच्या संकल्पाचा आधी विचार करा, असंही त्या म्हणाल्या आहेत.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर हा मुळात वादाचा विषय नाहीये. संभाजीनगर प्रस्ताव आधीच ठेवलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुखही आहेत. महाविकास आघाडीतील घटक, संभाजीनगरच्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here