नवी दिल्ली: ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत राजपथाची सजावट करण्यात आली आहे. थोड्याच वेळात राजपथावर लष्कराची शक्ती, देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीचे दर्शन संपूर्ण देशाला होणार आहे. आजच्या विशेष अशा दिनी ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उपगृहाचा लक्षभेद करणारे ‘शक्ती’ भीष्म रणगाडा, इन्फॅन्ट्री युद्ध वाहन आणि नुकतेच हवाई दलात सहभागी झालेले चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर हे आजच्या भव्य लष्करी संचलनाचे भाग असतील.

शहिदांना श्रद्धांजली देतील पंतप्रधान मोदी
प्रजासत्ताक दिन संचलनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया गेट जवळ राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतील.

पंतप्रधानांसोबत १०५ टॉपर पाहतील संचलन

सीबीएसई आणि विद्यापीठांचे एकूण १०५ टॉपर भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाचे राजपथावरील भव्य दृश्य पाहतील. यात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे ५० विद्यार्थी, इयत्ता १० वीतील ३० विद्यार्थी, तसेच १२ वीचे २५ विद्यार्थी सहभागी होतील.

२१ तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीताची धून

परंपरेनुसार प्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवला जाईल. त्यानंतर २१ तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीताची धून वाजवली जाईल. संचलनाची सुरूवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याद्वारे संचलनाकडून सलामी स्वीकारत होईल.

अशी होईल संचलनाची सुरुवात

संचलनाची पहिली तुकडी ही लष्कराची ६१ वी घोडेस्वारांची तुकडी असेल. अशा सहा तुकडया असलेली ही तुकडी ऑगस्ट १९५३ साली स्थापन झाली. ही जगातील एकमेव अशी लष्करी घोडेस्वारांची तुकडी आहे. या संचलनात ६१ व्या धोडेस्वार तुकडीचे पथक, आठ मॅकेनाइज्ड पथके, सहा पायदळ पथकं असणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here