ठाणे: देशातील , मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, या राज्यांत बर्ड फ्यू साथ वेगाने पसरत असतानाच ठाण्यातील वाघबीळ परिसरात १५ पाणबगळे मृतावस्थेत आढळल्याने काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाणबगळ्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा शोध घेतला जात आहे. आरोग्य यंत्रणेकडून या संपूर्ण प्रकारावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. ( Update )

वाचा:

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ परिसरातील विजय नगर, वाटिक इमारत येथून आज दुपारी साडेतीन वाजता पक्षांच्या मृत्यूची तक्रार आली होती. ही तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा घटनास्थळी १५ जातीचे पक्षी मृत अवस्थेत आढळून आले. या पक्षांना पशुवैधकीय विभागामार्फत पशुसंवर्धन रुग्णालय (Animal husbandry hospital), मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

वाचा:

सदर पाणबगळ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत सविस्तर अहवाल पशुसंवर्धन रुग्णालय, मुंबई यांच्याकडून प्राप्त होईल असे पशुवैधकीय विभागातून कळवण्यात आले आहे. परंतु, सध्या केरळ व अन्य राज्यांत बर्ड फ्लूचे संकट घोंगावत असताना ठाण्यात पक्षांच्या मृत्यूच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here