मुंबई: बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियमवर (अधिमूल्य) ५० टक्के सूट देण्याचा निर्णय हा केवळ विकासकांना डोळ्यापुढे ठेऊन घेण्यात आला असून, त्यामुळे सामान्य ग्राहकांना कुठलाही लाभ मिळणार नाही, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी केला आहे. ( Latest News Update )

वाचा:

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाने आता जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे केवळ काही विकासकांनाच मोठा फायदा होणार आहे. कुठलीही सवलत द्यायला आमचा नकार नाही. करोना नंतरच्या काळात काही सवलती दिल्याही पाहिजेत. पण, ज्या पद्धतीने ही सवलत देण्यात आली आहे, त्याचे फायदे केवळ काही विकासकांना होणार आहेत. आम्ही जे आक्षेप नोंदविले होते, त्यावर त्यांनी एक निर्णय केला की, ज्यावर्षीचे दर अधिक असतील, तो आधार मानण्यात येईल. पण, दुसरा जो निर्णय बिल्डरने देण्यासंदर्भातील केला, त्याचा फारसा लाभ होणार नाही. कारण, बिल्डरला मिळणारा फायदा आणि त्याला द्यावी लागणारी स्टँप ड्युटी यात फार मोठे अंतर आहे.

वाचा:

प्रिमियम कमी करायचे असतील आणि त्याचा फायदा प्रत्यक्ष जनतेला द्यायचा असेल तर यासाठी रेराच्या यंत्रणेचा उपयोग करायला हवा आणि त्यांच्या माध्यमातून हा फायदा प्रत्यक्ष ग्राहकाला मिळतोय, हे सुनिश्चित केले पाहिजे. पण, सरकारने तसे न केल्याने या निर्णयाचा फायदा केवळ विकासकाला होईल. त्यातही काही लोकांना तर फारच मोठा फायदा होईल. पण, ग्राहकांना फायदा होणार नाही. यासंदर्भात आम्हाला अनेक चर्चा ऐकायला मिळत आहेत. त्यासंदर्भात मी आताच काही बोलणार नाही. मी जे पत्र पाठविले होते, त्यासंदर्भात पूर्ण समाधान झालेले नाही. यासंदर्भात बरीच माहिती माझ्याकडे प्राप्त होते आहे. ती संपूर्ण माहिती प्राप्त होताच पुन्हा त्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. यातील गडबड घोटाळा त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. या संपूर्ण प्रकरणात जो अर्थपूर्ण व्यवहार झालेला आहे, ती चर्चा व्यथित करणारी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विमानतळाच्या नावावरून मुख्यमंत्र्यांना टोला

विमानतळाला यांचे नाव देण्याबाबत मुख्यमंत्री यांनी केंद्राला लिहिलेल्या पत्राबाबत पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. ‘संभाजीनगर येथील विमानतळाला नाव देण्याबाबत केंद्र सरकार योग्य वेळी निर्णय घेणारच आहे. मात्र, आपली महापालिका पूर्णपणे निष्क्रीय आहे. लोकांचे प्रश्न सुटलेले नाही. लोकांना तोंड दाखवायला जागा नाही, म्हणून असे विषय आता आणले जात आहेत’, असा आरोप फडणवीस यांनी केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here