नवी दिल्लीः केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये येत्या शुक्रवारी ८ जानेवारीला बैठक होणार आहे. याआधी शेतकरी उद्या शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शेतकरी आंदोलनाचा ( ) बुधवारी ४२ वा दिवस आहे. सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या ८ फेऱ्या झाल्या आहेत. पण अद्याप कुठलाी तोडगा निघालेला नाही. आता सर्वांचं लक्ष ८ जानेवारीच्या बैठकीकडे लागलं आहे. तिन्ही मागे घ्यावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. सरकारने अनेकदा एमएसपी कायम ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे. पण शेतकऱ्यांना एमएसपीवर लेखी हमी हवी आहे.

केएमपी एक्स्प्रेस मार्गावर ट्रॅक्टर मोर्चा

संयुक्त किसान मोर्चाद्वारे गाझीपूर सीमेवरुन पलवलपर्यंत ट्रॅक्टर यात्रा काढण्यात येणार आहे. ही ट्रॅक्टर यात्रा कुंडली मानेसर पलवल म्हणजेच केएमपी एक्स्प्रेस मार्गावर काढण्यात येणार आहे. ही ट्रॅक्टर यात्रा दुलई, दासना बील अकबरपूर, सिरसा मार्गे ईस्टर्न पेरिफेरल रोड मार्गे पलवलकडे जाईल आणि तिथून परत येईल.

केंद्र सरकारने ८ जानेवारीच्या बैठकीत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही तर ९ जानेवारीला कृषी कायद्याच्या प्रती जाळण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. तसंच ९ जानेवारीपासून हरयाणामधील शेतकरी संघटना घरोघरी जाऊन नागरिकांशी संपर्क साधतील, असं शेतकरी संघटनांनी म्हटलंय.

एकाचवेळी चार जत्थे निघणार

हे चार जत्थे गुरुवारी सकाळी ११ वाजता सुटतील. पहिली तुकडी सिंघू सीमेवरून टिकरी सीमेवर जाईल. दुसरा जत्था टिकरी सीमेपासून कुंडलीपर्यंत जाईल. हे दोन्ही जत्थे सांपला आणि कुंडलीच्या मध्यभागापर्यंत जाऊन परत येतील. तिसरा जत्था गाझीपूरहून पलवलकडे जाईल. चौथा जत्था रेवासन ते पलवल येथे जाईल. हे दोन्ही जत्थे पलवलहून त्यांच्या परत येतील.

शेतकऱ्यांनी उद्याच्या ट्रॅक्टर यात्रेसाठी हायटेक तयारी केली आहे. जत्थ्यांचे गुगल लोकेशनी देण्यात आले आहे. याखेरीज दोन प्रभावी आणि जबाबदार शेतकरी नेत्यांकडे संपर्काची सूत्रे देण्यात आली आहेत. त्यांचे मोबाइल क्रमांकही सार्वजनिक केले आहेत.

२६ जानेवारीला राजपथावर परेडचा इशारा

शेतकरी संघटनांनी २६ जानेवारीला दिल्लीतील राजपथावर ट्रॅक्टर परेड करण्याचा इशारा दिला आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांची परेड होईल आणि याची झलक उद्याच्या ट्रॅक्टर यात्रेत दिसून येईल, असं शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here