मुंबई: मुंबईच्या यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण गुजरातमधील येथील असल्याचे स्पष्ट झाले असून त्याला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या तरुणाला घेऊन पोलीस पथक उद्या मुंबईत पोहचणार असून त्याने महापौरांना धमकी का दिली, हे अधिक चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. ( Latest Update )

वाचा:

महापौर यांना धमकी देणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याच्या माहितीला आझाद मैदान पोलिसांनी दुजोरा दिला आहे. आमचे पथक या तरुणाला घेऊन मुंबईत परतत असून त्याने कशासाठी हे कृत्य केले, हे चौकशीतून समोर होईल असेही एका अधिकाऱ्याने नमूद केले.

वाचा:

नेमकं काय घडलं होतं?

२१ डिसेंबर रोजी एका अनोळखी नंबरवरून महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचा फोन आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव न सांगता पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. ही व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. त्याने फोनवर महापौरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली होती. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास महापौर पालिका मुख्यालयात असतानाच त्यांना हा धमकीचा फोन आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी याबाबत ठाण्यात तक्रार करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या ५०४, ५०६ (२), ५०७, ५०९ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता व आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता. अखेर हा कॉल करणारी व्यक्ती जामनगर येथील असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तिथे धडक देत या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here