कोल्हापूर: कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तीन सख्ख्या भावांनी धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. आकाश वांजळे असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. (Man dies after being attacked by Neighbour)

क्रांतिसिंह नाना पाटील नगरमध्ये बुधवारी मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली. वांजळे आणि संशयित आरोपी शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यात काही दिवसापासून मतभेद निर्माण झाले होते. बुधवारी सायंकाळी कचरा टाकण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

यावेळी संशयित भारत कचरे, दिलीप कचरे आणि सुरेश कचरे या तिघांनी आकाश आनंदा वांजळे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. गंभीर अवस्थेत त्यास सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here