ऑकलंड: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना इडन पार्कवर होतोय. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून ही आघाडी आणखी वाढवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पहिल्या टी-२० प्रमाणेच या सामन्यात देखील मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे.
Live अपडेट-
>> न्यूझीलंडची आक्रमक सुरूवात, पहिल्याच ओव्हरमध्ये २ षटकारांसह केल्या १३ धावा
>> न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात
>> भारतीय आणि न्यूझीलंड संघात कोणताही बदल नाही
>>
>> भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूजीलंडने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times