मुंबई: मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवर औरंगाबादचा उल्लेख केला गेल्यामुळं काँग्रेसनं तीव्र नाराजी दर्शवली होती. त्यानंतर लगेचच ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी संबंधितांना समज देऊ असा खुलासा केला. त्यावरून भारतीय जनता पक्षानं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं डोळे वटारताच अधिकाऱ्यांना समज देण्याची भाषा करणारे नामांतर काय करणार, असा टोला भाजपनं हाणला आहे.

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करण्याचा मुद्दा सध्या राज्यात वादाचा विषय ठरला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतच यावरून मतभेद आहेत. नामांतरासाठी आग्रही आहे. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळाचे नामांतर करण्याची आठवण देणारे पत्र नागरी उड्डाण मंत्र्यांना केलं आहे. तर, काँग्रेसचा नामांतराली तीव्र विरोध आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेळोवेळी याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे.

वाचा:

असं असतानाही काल राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंटवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा करण्यात आला होता. त्यावरून काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे,’ असा संताप थोरात यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेसचेच एक मंत्री अस्लम शेख यांनी याबद्दल वृत्तवाहिन्यांशी बोलताना खुलासा केला. ‘टाइप करताना कधीतरी चूक होत असते. मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्विटर हँडल करणाऱ्या व्यक्तीला समज देण्यात येईल,’ असं त्यांनी सांगितलं. त्यावरून महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे.

‘काँग्रेसनं ठणकावलं की लगेच शिवसेनेनं साष्टांग दंडवत घातला. साधं ट्विटरवर संभाजीनगर म्हणू शकत नाही? काँग्रेसनं डोळे वटारताच संभाजी नगरचा उल्लेख करणाऱ्याला समज देण्याची भाषां? हे नामांतर काय करणार?,’ असं सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here