मुंबईः ‘काँगेस नेते यांच्यावर अपशब्दात टीका करणं योग्य नाही ती आपली संस्कृती नाही. स्वातंत्र्य काळात काँग्रेस पक्षाचं योगदान मोलाचं आहे. त्यामुळं जनतेला जर काँग्रेसचं नेतृत्व गांधी कुटुंबानं करावं असं वाटत असेल तर तो पक्षाचा निर्णय आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

‘काँग्रेस हा सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. गावागावत पोहचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाचं योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि इतरांनीही देशासाठी त्याग केला आहे. त्या पक्षाचं अध्यक्षपद हे देशातील राजकारणातील एक महत्त्वाचं पद आहे. अशा काँग्रेसच्या नियोजित अध्यक्षाला ते विरोधी पक्षाचे नेते आहेत म्हणून अपशब्द वापरणे ही आपली संस्कृती नाही, अशी टीका राऊत यांनी केंद्रातील सत्त्ताधारी भाजपवर केली आहे. तसंच, सत्ताधारी पक्षांनी देशाचा इतिहास पाहिला पाहिजे विरोधी पक्ष आज दुबळा वाटत असला तरी अचानक तो फिनिक्स पक्षाप्रमाण झेप घेतो आणि ताकद दाखवतो,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

‘महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाच्या नावाने पक्ष चालतो. प्रत्येक पक्षाचा एक चेहरा असतो. तो चेहरा म्हणजे घराणेशाही नाही. त्या कुटुंबानंही पक्षवाढीसाठी खूप त्याग केलेला असतो. त्यामध्ये गांधी कुटुंबही आहे. जर जनतेला गांधी कुटुंबानं पक्षाचं नेतृत्व करावं असं वाटत असेल तर तो पक्षाचा निर्णय आहे,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

‘प्रत्येक पक्षांत अंतर्गत वाद असतात. भाजपमध्येही होते, समाजवादी पक्षातही होतात. मग काँग्रेसमध्ये असेल तर मग बिघडलं कुठं? असा सवाल करतानाच पक्षात अंतर्गंत वाद असणं हे लोकशाहीचं लक्षणआहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here