मुंबईः राज्यात शहराच्या नामांतराचा वाद सुरु असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामकरणाचा मुद्द्यांवर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मतभेद सुरु आहेत. त्यातच त्यातच मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवरून राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ करण्यात आल्यामुळं काँग्रेसनं यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘बुधवारी रात्रीपासून या विषयावर सातत्याने बातम्या ऐकायला मिळतात. सरकारचं काम करत असताना एखादी गोष्ट घडलेली असताना त्यामागची पार्श्वभूमी काय आहे. कोणी जाणीवपूर्वक गडबड केली का? या बाबी आम्ही तपासू,’ अशा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय. तसंच, ‘सकाळपासून मी जनता दरबार घेत आहे. आता मंत्रालयात गेल्यावर संबंधित पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करु आणि मार्ग काढू,’ असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. तसंच, ‘महाविकास आघाडीचे सरकार समान कार्याक्रमावर चालवत आहोत, त्यामुळं एकत्र बसून त्यावर निर्णय घेऊ,’ अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे.

कोणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कोणी भावनिक मुद्दे काढतं, कोणी विकासाबद्दल बोलतं, कोणी नामकराणाबद्दल बोलतं, अशा गोष्टी महाराष्ट्राच्या ६० वर्षाच्या इतिहासात घडल्या आहेत, असं म्हणत अजित पवारांनी पुण्याच्या नामकरणाच्या मागणीबाबत भाष्य केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here