मुंबईः माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांचं नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘डाव’ या मराठी सिनेमातील हे गाणं आहे.

अमृता फडणवीस यांचं संगीत प्रेम सर्वश्रुत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक कार्यक्रमात गाणी गायली आहेत. तसंच, अनेक गाण्यांचे अल्बमही त्यांनी केले असून महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही एका सिनेमात गाणं गायलं होतं. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस एका मराठी सिनेमात गाणं गायलं आहे. आज अमृता यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्री आणि गुलशन देवैया या जोडीवर चित्रित असलेल्या डाव या चित्रपटातील अंधार हे गाणं आहे. हे गाणं लेखक मंदार चोळकर यांनी लिहलं असून संगीत जीत गांगुली यांनी दिलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी याआधी भाऊबीजीच्या निमित्तानं तिला जगू द्या हे गाणं गायलं होतं. प्रत्येक भगिनीला हे गीत समर्पित असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, या गाण्याला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. त्या गाण्याला लाइक्सपेक्षा डिसलाइकच अधिक मिळाले होते. याशिवाय अनेक प्रतिक्रियाही मिळाल्या होत्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here