मुंबईः बांधकाम विकासकांना प्रमियममध्ये ५० टक्के सलवत देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीविरोधात या निर्णयावर टीका होताना दिसत आहे. तर, महाविकास आघाडीचे नेतेही भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहे. याचमुद्द्यावरुन भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ट्विटरयुद्ध सुरु आहे. दोन्ही नेत्यांनी कवितेच्या माध्यमातून या टीकेला उत्तर दिलं आहे.

यांचं ट्विट
केशव उपाध्य यांनी काव्यमय शैलीत ठाकरे सरकारच्या निर्णायावर निशाणा साधला आहे. गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…. उध्दवा अजब तुझे सरकार, असं म्हणत उपाध्ये यांनी सरकारवर हल्ला चढवला होता. तसंच, त्या खाली मंत्र्यांच्या गाड्यांना सरकार पैसे देत, कंत्राटदारांची बिल द्यायला सरकारकडे पैसे आहेत, खोट्या बिलांचे पैसे दिले जातात पण मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलत मिळत नाही. वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

केशव उपाध्ये यांच्या ट्विटवर काँग्रेसचे प्रवक्ते यांनीही कावितेतून उपाध्ये यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. केंद्रातील मोदी सरकारवरही सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे.

उघड डोळे बघ नीट केशवा,
तुझा शब्दच्छल आहे फसवा
अरे अजब नव्हे, गजब आहे हे सरकार,
नाठाळांच्या माथी धोंडा अन्
जनतेला मणिहार
मोदी कृपेने करोडो झाले बेरोजगार
भाजपासाठी बिल्डर असे मलिदा,
आमच्यासाठी बांधकाम क्षेत्र जनतेला रोजगार
समाधानी आज राज्यातला बापडा,
म्हणतोय, मविआ ‘छे आपडा’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here