मुंबईः आज राज्यात ७२ रुग्णांचा करोना संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. तर, ३ हजार ७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील करोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढल्यानं चिंता अधिक वाढली आहे. ()

राज्यातील करोना स्थितीच्या आकडेवारीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेच. कधी एकाच दिवशी १० हजारांच्या संख्येनं रुग्ण बरे होत आहेत तर कधी करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. राज्यातील करोनाच्या या स्थितीमुळं पुन्हा आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली. राज्यातील मृत्यूदर मात्र सध्या स्थिर असल्यानं काही अंशी दिलासा मिळत आहे. आज राज्यात ७२ करोना रुग्ण दगावले असून एकूण करोना मृतांचा आकडा ४९ हजार ८७९ इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर सध्या २.५५% इतका झाला आहे.

गेल्या २४ तासांत ३ हजार ७२९ नवीन करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण करोनारुग्णांचा आकडा १९ लाख ५८ हजार २८२ इतका झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडाही वाढताना दिसत आहे. सध्या राज्यात ५१ हजार १११ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्याही करोना बाधित रुग्णांच्या जवळपास आहे. आज राज्यात ३ हजार ३५० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख ५६ हजार १०९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९४. ७८ टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३१,९९,२०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,५८,२८२ (१४.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,७०,२१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबई महापालिका हद्दीत आज ६६५ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं एकूण रुग्णसंख्या २ लाख ९६ हजार ९८५ इतकी झाली आहे. तर, मुंबईत सध्या ७ हजार ७५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here