ब्रिटनहून महाराष्ट्रात परतलेल्या एकूण बाधित रुग्णांपैकी पुण्यापाठोपाठ आता पिंपरी चिंचवडमधील आणखी तिघांना नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज्यातील नव्या विषाणूच्या बाधितांची संख्या ही ११ एवढी झाली आहे. पिंपरी चिंचवड भागातील रहिवासी असलेले हे तिघेही २० डिसेंबरला पिंपरी चिंचवडमध्ये आले. त्यावेळी त्यांना कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, ब्रिटनहून आल्याने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाले.
या तिघांचे २८ डिसेंबरला नमुने जनुकीय चाचणीचा शोध घेण्यासाठी एनआयव्हीला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल ‘एनआयव्ही’कडून गुरुवारी प्राप्त झाला. त्यात त्यांना नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्या तिघांना भोसरी येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे रोग सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times