मुंबईः २०२०मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेस व शिवसेना काय करणार असा प्रश्न चर्चिला जात असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोठं विधान केलं आहे.

मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस एकला चलोची भूमिका घेतली आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याविषयी उस्तुकता असतानाच राष्ट्रवादीच्या गोटातून पालिका निवडणूक एकत्र लढवण्याची तयारी सुरु आहे. राष्ट्रवादीच्या नेतेही याबाबत सकारात्मक असल्याचं पाहायलं मिळतंय. अजित पवार यांनी नुकतंच आघाडीबाबात प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यात आता नवाब मलिक यांनीही महापालिका निवडणूकीसाठी एकत्र लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई महापालिका किंवा महाराष्ट्राबाबत पवारसाहेबांची भूमिका स्पष्ट आहे. आघाडी असताना तिन्ही पक्षांना एकत्रच निवडणुका लढायला हव्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका तिन्ही पक्षांनी एकत्रित लढवावी अशी पवारांची भूमिका आहे, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

पालिका निवडणुकांबाबत आता काँग्रेस नेते बोलत आहेत. पण त्याबाबत आता अधिकृत चर्चा सुरु झालेली नाहीय. तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला हवं, ही आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. पण काँग्रेसची भूमिका ते ठरवतीय, असंही ते म्हणाले आहेत.

वाचाः

दरम्यान, शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली असून या बैठकीत आज पक्षवाढीसाठी कोणते कार्यक्रम घ्यायचे व मंत्री व नेत्यांच्या नेतृत्वात काय काम झाली, याचा आढावा घेण्यात आला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here