वाचा:
राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी नितीन गडकरी मुंबईत आले होते. मात्र, पक्षीय राजकारणापलीकडे मैत्री जपणारा दिलखुलास नेता अशी ओळख असलेल्या गडकरी यांनी या दौऱ्यात वेळात वेळ काढून शिवसेनेच्या दोन प्रमुख नेत्यांची आज आवर्जून भेट घेतली. त्यामुळे बैठकीपेक्षा याच भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली.
वाचा:
गडकरी यांनी आज सकाळी माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. जोशी यांना नमस्कार करत गडकरी यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यामागचं कारणही तसंच आहे. जोशी मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा गडकरी यांच्याकडे देण्यात आली होती आणि त्या संधीचं गडकरी यांनी सोनं केलं होतं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे साकारण्यात गडकरी यांचा सिंहाचा वाटा राहिला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर गडकरी-जोशी भेट लक्ष्यवेधी ठरली.
वाचा:
मनोहर जोशी यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी गडकरी यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या. राज्यात भाजपचे नेते शिवसेनेवर व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सातत्याने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट टाळून फडणवीस आपल्या मागण्या पत्रव्यवहारातून मांडत आहेत. एकीकडे दोन्ही पक्षांत सध्या विस्तवही जात नसताना गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची आवर्जून भेट घेतल्याने त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मेट्रो कारशेडचा वाद, औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर, राज्यपाल नियुक्त सदस्यांचा तीढा हे मुद्दे सध्या कळीचे ठरले असून त्या पार्श्वभूमीवरही ठाकरे-गडकरी भेट महत्त्वाची मानली जात आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times