म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चोरी करण्याच्या उद्देश्याने आलेल्या दोघांना अर्धनग्न करून त्यांचे मुंडन केल्याचा प्रकार कांदीवलीतून समोर आले आहे. विशेष म्हणजे हा व्हीडीओ जमावाने सोशल मिडियावर व्हायरल केला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली.

कांदिवली पश्चिमेकडील जनता काॅलनी परिसरात राहणाऱ्या दोघांना ६ जानेवारी रोजी ८ ते १० जणांनी जबरदस्तीने घराबाहेर काढले आणि मालाड काचपाडा येथे नेले. चोरीचा आरोप करीत या दोघांना मारहाण केली. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर या दोघांचे मुंडन केले, मिशा कापल्या आणि याचे चित्रिकरण करून सोशल मिडियावर व्हायरल केला. हा व्हीडीओ पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या जमावापैकी पाच जणांना शोधून काढले. या पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here